उन्हाळ्यात हे' झाड आपल्या पोटात साठवते पाणी?   

व्हिडिओ झाला व्हायरल

 
इल्लूर : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. आंध्र प्रदेशातील पापीकोंडा राष्ट्रीय उद्यानात वन विभागाचे कर्मचारी एका झाडावर कुऱ्हाडीने वार करत असताना आणि त्या झाडामधून पाण्याचा प्रवाहच बाहेर येतो. एखाद्या नळातून बाहेर पडावे तसे पाणी या झाडाच्या खोडातून बाहेर पडू लागते. काही नेटिझन्सनी या व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र हा व्हिडिओ खरा असून; हे खास झाड भारतात आढळते.
 
या झाडाचे नाव टर्मिलिया टोमेनटोसा (Terminalia Tomentosa) असे आहे. या झाडाला क्रोकोडाईल बार्क ट्री (Crocodile Bark Tree) किंवा इंडियन लॉरेल ट्री या नावांनीही ओळखले जाते. या झाडाचं वैशिष्ट म्हणजे, या झाडाच्या बुंध्यामध्ये कित्येक लीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. ही झाडे सुमारे ३० मीटर उंच वाढतात. साधारणपणे शुष्क आणि दमट जंगलांमध्ये ही झाडे आढळतात.
 
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला व्हिडिओ IFS नरेंद्रन यांच्या एक्स अकाउंटवरुन पोस्ट झाला त्या नंतर बऱ्याच वृत्तसंस्था आणि सरकारी अधिकृत खात्यांवरूनही शेअर झाला. या झाडाबाबत आपल्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे. आंध्र प्रदेशातील कोंडा रेड्डी समुदायाने याबाबत माहिती दिल्याचे नरेंद्रन यांनी सांगितले. 
 
नरेंद्रन यांनी 'द हिंदू' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले , की "या झाडांमध्ये खरोखरच पाणी साठवण्याची क्षमता आहे की नाही हे आम्हाला पहायचे  होते. आम्ही जेव्हा एका झाडाची साल काढली, तेव्हा त्यातून खरोखरच मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर आले. या पाण्याची चव थोडी आंबट असते, आणि यातून उग्र वास येतो."

या वृक्षाचे लाकूडही महाग

 
या झाडाचे  लाकूड 'इंडियन सिल्व्हर ओक' म्हणून ओळखले जाते. हे अतिशय महागडं लाकूड आहे. या झाडाच्या आतमध्ये पाणी असल्यामुळे याचे खोड इतर झाडांच्या तुलनेत अग्निरोधक (फायर-प्रूफ) समजले जाते. यासोबतच या झाडाला धार्मिक महत्त्वही आहे. बौद्ध समाजाचे लोक याला 'बोधिवृक्ष' म्हणून ओळखतात.

https://twitter.com/IndianTechGuide/status/1774678077962137670

Related Articles