पश्चिम बंगालला चक्रीवादळाचा मोठा फटका!   

५ जण ठार तर शेकडो जखमी, ममता बॅनर्जी उत्तर बंगालमध्ये रवाना
 
कोलकाता : वादळामुळे पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात बरेच नुकसान झाले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, रविवारी राज्याच्या जलपाईगुडी जिल्ह्याच्या काही भागात आलेल्या वादळामुळे पाच जण मृत्युमुखी पडले. या वादळात १०० हून अधिक लोक जखमी झाले.
 
राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल घटनास्थळाचा आढावा घेतला. त्याचबरोबर जखमींची देखील भेट घेतली आहे. या परिस्थितीत प्रशासन सर्व प्रकरची मदत करेल असे आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे.पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात रविवारी दुपारी भीषण चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी घरे पडली, झाले उन्मळून गेली, विजेचे खांब पडले. या वादळामुळे आत्तापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत.
 
मुख्यमंत्र्यांनी त्यांचा नियोजित दौरा रद्द करून रविवारी रात्री जलपाईगुडीची पाहणी केली. परिस्थितीचा आढावा घेतला.रविवारी पश्चिम बंगालमध्ये धडकलेल्या चक्रीवादमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या वादळामध्ये द्विजेंद्र नारायण सरकार (52), अनिमा रॉय (49), जोगेन रॉय (70) आणि समर रॉय (64) यांचा मृत्यू झाल्याचे समजते. 
 
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, या आपत्तीमुळे घरांचे नुकसान झाले, पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींमधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पीडितांना मदत करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. प्रशासन गरजू लोकांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिले.

Related Articles