'अरुणाचल'वर दावा करत नावे बदलेल्या ३० ठिकाणांची चौथी यादी केली जाहीर   

नवी दिल्ली : भारत-चीन सीमासंघर्ष हा दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. चीनने आधिपासूनच भारताच्या अरुणाचल प्रदेश या राज्यावर आपला दावा सांगितला आहे. आता तर त्यांनी या भागातील ३० भागांची नाव बदलल्याची यादीच जाहीर केली आहे. चीनने या भागातील भारतीय नाव बदलून चीनी नावे  ठेवल्याचे सांगितले जात आहे.
 
चीनने प्रदेशांची नाव बदलल्याची ही चौथी यादी जाहीर केली आहे. पण भारत सरकारने चीनची प्रत्येक यादी नाकारली आहे. तसेच अरुणाचल प्रदेशाची प्रत्येक इंच न् इंच जमीन भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले. चीनच्या चिनी नागरिक प्रकरणांच्या मंत्रालयाने ही चौथी यादी जाहीर केली आहे. चीनच्या सरकारी 'ग्लोबल टाइम्स' या वृत्तपत्रातील वृत्तानुसार, दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे सांगत चीनने या भागाचे नामकरण केले आहे.
 

अरुणाचल प्रदेशात सातत्याने चीनच्या कुरघोडी 

 
चीनकडून या भागातील नाव बदलणारी पहिली यादी सन २०१७ मध्ये आणली होती. त्यानंतर २०२१ मध्ये १५ जागांच्या नामकरणाची यादी जाहीर केली होती. त्यानंतर २०२३ मध्ये ११ जागांची यादी तर आता २०२४ मध्ये ३० जागांची नाव बदलल्याची यादी जाहीर केली आहे.
 

Related Articles