आसाम हस्तकला जीआय मानांकन   

गुवाहाटी : आसामच्या सहा पारंपरिक हस्तकला उत्पादने, वस्तूंना भौगोलिक मानांकन (जीआय) टॅग मिळाले आहे. यात बिहू ढोल, जापी (बांबूपासून बनविलेली पारंपरिक टोपी), सारथेबारी येथील बेल धातूची हस्तकला, आसाम अशारिकांडी तेराकोट्टा हस्तकला, आसाम मिसिंग हातमाग उत्पादने आदींचा समावेश आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज ‘एक्स’वरुन दिली. ही सर्व उत्पादने जवळपास एक लाख लोकांना थेट साहाय्य करतात, असेही त्यांनी सांगितले.
 
राज्यांच्या वारशाचा हा मोठा विजय आहे. नाबार्ड, आरओ गुवाहाटीच्या मदतीने आसाममधील सहा पारंपरिक हस्तकला उत्पादनांचा जीआय तज्ज्ञ डॉ. रजनीकांत यांनी जीआय टॅग देऊन सन्मान केला आहे, असे सरमा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या हस्तकलांना जीआय टॅग मिळण्यासाठी २०२२ मध्ये अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, शनिवारी (ता.३०) प्रमाणपत्रांची पुष्टी करण्यात आली.

Related Articles