आसाममध्ये तुफान पाऊस ; विमानतळाचे छत कोसळले   

विमानांचे मार्ग वळवले

 
आसाममध्ये सध्या तुफान पाऊस सुरु असून या पावसाचा फटका इथल्या विमानतळाला बसला आहे. लोकप्रिय गोपिनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छताचा काही भाग रविवारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कोसळला. या दुर्घटनेत कोणीही जखमी नाही. पण यामुळे सहा विमानांचे मार्ग बदलण्यात आले. या विमानतळच्या देखभालीची जबाबदारी अदानी समुहाकडे आहे. 
 
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यात छताचा एक भाग अचानक कोसळताना दिसत आहे. अचानक घडलेल्या या घटनामुळे प्रवासी आणि विमानतळ कर्मचारी बचावासाठी धावताना दिसत आहेत. तर इतर काही व्हिडिओंमध्ये विमानतळ कर्मचारी आवारातील अतिरिक्त पाणी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. विमानतळ कर्मचाऱ्यांनी सांगितले की, "विमानतळाच्या छताचा जो भाग कोसळला तो खूप जुना झाला होता आणि त्यामुळे तुफान पाऊस आणि हवा तो सहन करू शकला नाही. परिणामी तो भाग कोसळला आणि त्यामुळे टर्मिनलमध्ये पाणी वाहू लागले. मात्र, यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही आणि सर्व काही नियंत्रणात आहे," इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसची उड्डाणे आगरतळा आणि कोलकाता येथे  वळवली. पण नंतर दृश्यमानता सुधारल्याने विमानाची उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली आणि गुवाहाटी विमानतळावर विमाने उतरण्यास सुरुवात झाली.
 

Related Articles