मुंबई बंगळूर महामार्गावर टेम्पोचा अपघात ; कोणीही जखमी नाही   

कात्रज : मुंबई बंगळूर महामार्गावरून जाणाऱ्या दूध वाहतूक टेम्पोचा अपघात झाल्याची घटना सोमवारी सकाळीनऊच्या दरम्यान जांभूळवाडी दरी पुलाजवळ घडली. वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहन दुभाजकाला धडकले व अपघात झाला. दोघे जण वाहनामध्ये होते या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची माहिती भारती विदयापीठ वाहतूक विभागाला मिळताच क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले व वाहतूक सुरळीत केली. ही कामगिरी पोलिस निरीक्षक विजय तिकोळे यांच्या मार्गदर्शना नुसार पोलिस उपनरीक्षक अविनाश शिंदे पोलीस हवालदार  कुलाळ, पोलीस नाईक कुडले, पोलीस शिपाई कसबे, पोलीस शिपाई चोरमले यांनी केली.

Related Articles