लोकसभेसाठी मोदींचे ‘मॅच फिक्सिंग’   

इंडिया आघाडीच्या सभेत राहुल यांची टीका

 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी ‘मॅच फिक्सिंग’ केले असून निवडणूक जिंकण्यासाठी ईव्हीएम, तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केली. निवडणुकीत भाजप विजयी झाला, तर घटना बदलण्याबरोबर नागरिकांचे हक्क हिरावून घेतले जातील, असा इशारा त्यांनी दिला.इंडिया आघाडीच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनासाठी लोकशाही वाचवा मेळावा रामलीला मैदानावर झाला. त्यावेळी ते बोलत होते.
 
राहुल म्हणाले, क्रिकेटमध्ये पंच, कर्णधार, खेळाडूंवर दबाव आणून ज्या प्रमाणे मॅच फिक्सिंग करून सामने जिंकले जातात, त्याचप्रमाणे लोकसभा निवडणूक जिंकण्याचा घाट घातला जात आहे. सामना सुरू होण्यापूर्वी निवडणूक आयुक्त कोणी निवडले? अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन या खेळाडूंना अटक केली. असे करून मोदी यांनी निवडणुकीसाठी मॅच फिक्सिंग केले आहे. भाजपने ४०० जागा जिंकणार असल्याची घोषणा केली; पण ती ईव्हीएम, मॅच फिक्सिंग आणि विरोधी पक्षांवरील दबावाशिवाय की माध्यमांना खरेदी न करता केली आहे का? या सर्व बाबींचा वापर भाजपने केला नाही तर तो २०० जागादेखील जिंकू शकणार नाही! काँग्रेस देशातील सर्वात मोठा आणि विरोधी पक्ष असून पक्षाची सर्व बँक खाती गोठवली आहेत. दोन मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे. त्यामुळे ही कोणती निवडणूक आहे? मोदी यांनी तीन-चार अब्जाधीशांच्या मदतीने निवडणुकीची मॅच फिक्स केली आहे. ४०० जागा द्या, आम्ही घटना बदलू, असे भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी सांगितले होते. त्याचा धागा पकडून राहुल म्हणाले, गरिबांकडून घटना हिसकावून घेण्यासाठी त्यांनी हा डाव रचला आहे. घटना हा नागरिकांचा आवाज आहे. ती समाप्त करून त्यांंंना संपविण्याचे कारस्थान रचले आहे. घटना बदलल्यास देशात आगडोंब उसळेल.
 
ईडी, सीबीआय आणि पोलिसांचा गैरवापर करून तुम्ही विरोधकांवर, तसेच माध्यमांवर दबाव आणू शकता; परंतु नागरिकांचा आवाज दाबू शकणार नाही. निवडणूक केवळ मतदान नसून देश आणि घटना वाचविण्यासाठी आहे. याचा विचार मतदारांनी करावा.
 

विरोधकांवरील कारवाई थांबवा : प्रियांका

 
विरोधकांवर ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. त्याचे विपरित परिणाम विरोधी पक्षांवर निवडणुकीत होत आहेत. त्यांचा गैरवापर थांबविण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केले. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची तातडीने सुटका करावी. 
 

संघ, भाजपमुळे देश नष्ट : खर्गे

 
भाजप विष आहे, त्याची चव मतदारांनी पुन्हा चाखू नये. संघ आणि भाजप देश नष्ट करत आहेत. केजरीवाल आणि सोरेन यांच्या अटकेमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे.मोदी यांनी  लोकसभेच्या निवडणुकीची खेळपट्टी विविध कारवाया करून अगोदरच खोदून ठेवली आहे. आता निवडणूक जिंकून दाखवा, असे ते सांगत आहेत. भाजपसह मोदी यांना हद्दपार केल्याशिवाय देशात समृद्धी येणार नाही. 

लोकशाहीवर हल्ला : शरद पवार

 
केंद्र सरकारने ज्या प्रमाणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली, अनेक राज्यांतील विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले आहे, ही कृती लोकशाहीवर हल्ला आहे. घटना वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी सांगितले.
 
ते म्हणाले, आज केजरीवालांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. याआधी हेमंत सोरेन यांना पाठवले होते. दिल्ली असो, महाराष्ट्र असो वा पश्चिम बंगाल तेथेही करवाई केली आहे. राजकीय नेते, आमदार, खासदारांना तुरुगांत पाठवले आहे. ही कारवाई घटना आणि लोकशाहीवरील हल्ला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेवरील हल्ला आहे. लोकशाही धोक्यात असेल तर ती वाचविण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे. मतदान करताना तुमचे मत भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांविरोधात द्या, असे आवाहन त्यांनी केले.
 

संमिश्र सरकार देशाला वाचवेल : उद्धव

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत निरंकुश पद्धतीने सरकार चालवत आहेत. विरोधी पक्षांवर तपासी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. नेत्यांना पक्षात सामील करून घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. अशा भाजप सरकारला हद्दपार करा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केेले. ते म्हणाले, हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. आम्ही याच हुकूमशाहीविरुद्ध लढत आहोत. आम्ही निवडणुकीच्या प्रचारासाठी येथे  आलो नसून लोकशाही वाचविण्यासाठी आलो आहोत. टीकाकारांना सरकार थेट तुरंगात पाठवते. हे असले कसले सरकार आहे? अगोदर हेमंत सोरेन आणि नंतर अरविंद केजरीवाल यांना अटक केली. केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता आणि हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना यांना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. या दोन बहिणी हिंमतीने लढत असतील, तर आम्ही सगळे भाऊ मागे कसे राहणार ? आपल्याला संमिश्र सरकार आणावे लागेल.
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी ‘मॅच फिक्सिंग’ केले असून निवडणूक जिंकण्यासाठी ईव्हीएम, तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केली. निवडणुकीत भाजप विजयी झाला, तर घटना बदलण्याबरोबर नागरिकांचे हक्क हिरावून घेतले जातील, असा इशारा त्यांनी दिला. 
 
इंडिया आघाडीच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनासाठी लोकशाही वाचवा मेळावा रामलीला मैदानावर झाला. त्यावेळी ते बोलत होते.राहुल म्हणाले, क्रिकेटमध्ये पंच, कर्णधार, खेळाडूंवर दबाव आणून ज्या प्रमाणे मॅच फिक्सिंग करून सामने जिंकले जातात, त्याचप्रमाणे लोकसभा निवडणूक जिंकण्याचा घाट घातला जात आहे. सामना सुरू होण्यापूर्वी निवडणूक आयुक्त कोणी निवडले? अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन या खेळाडूंना अटक केली. असे करून मोदी यांनी निवडणुकीसाठी मॅच फिक्सिंग केले आहे. भाजपने ४०० जागा जिंकणार असल्याची घोषणा केली; पण ती ईव्हीएम, मॅच फिक्सिंग आणि विरोधी पक्षांवरील दबावाशिवाय की माध्यमांना खरेदी न करता केली आहे का? या सर्व बाबींचा वापर भाजपने केला नाही तर तो २०० जागादेखील जिंकू शकणार नाही! काँग्रेस देशातील सर्वात मोठा आणि विरोधी पक्ष असून पक्षाची सर्व बँक खाती गोठवली आहेत. दोन मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे. त्यामुळे ही कोणती निवडणूक आहे? मोदी यांनी तीन-चार अब्जाधीशांच्या मदतीने निवडणुकीची मॅच फिक्स केली आहे. ४०० जागा द्या, आम्ही घटना बदलू, असे भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी सांगितले होते. त्याचा धागा पकडून राहुल म्हणाले, गरिबांकडून घटना हिसकावून घेण्यासाठी त्यांनी हा डाव रचला आहे. घटना हा नागरिकांचा आवाज आहे. ती समाप्त करून त्यांंंना संपविण्याचे कारस्थान रचले आहे. घटना बदलल्यास देशात आगडोंब उसळेल.ईडी, सीबीआय आणि पोलिसांचा गैरवापर करून तुम्ही विरोधकांवर, तसेच माध्यमांवर दबाव आणू शकता; परंतु नागरिकांचा आवाज दाबू शकणार नाही. निवडणूक केवळ मतदान नसून देश आणि घटना वाचविण्यासाठी आहे. याचा विचार मतदारांनी करावा.
 

विरोधकांवरील कारवाई थांबवा : प्रियांका

 
विरोधकांवर ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. त्याचे विपरित परिणाम विरोधी पक्षांवर निवडणुकीत होत आहेत. त्यांचा गैरवापर थांबविण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केले. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची तातडीने सुटका करावी. 
 

संघ, भाजपमुळे देश नष्ट : खर्गे

 
भाजप विष आहे, त्याची चव मतदारांनी पुन्हा चाखू नये. संघ आणि भाजप देश नष्ट करत आहेत. केजरीवाल आणि सोरेन यांच्या अटकेमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे.मोदी यांनी  लोकसभेच्या निवडणुकीची खेळपट्टी विविध कारवाया करून अगोदरच खोदून ठेवली आहे. आता निवडणूक जिंकून दाखवा, असे ते सांगत आहेत. भाजपसह मोदी यांना हद्दपार केल्याशिवाय देशात समृद्धी येणार नाही. 
 

मेळाव्यास यांची उपस्थिती

 
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खगेर्र्, राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, अखिलेश यादव, सीताराम येचुरी, डी. राजा, मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीच्या मंत्री आतिषी.
 

Related Articles