भाजपने २०० जागांचा टप्पा पार करून दाखवावाच   

ममतांचे आव्हान

 
कोलकाता : भाजप म्हणते ४०० पार, पण ते २०० जागांचा टप्पाही पार करू शकणार नाहीत, असे आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. या राज्यात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू होऊ देणार नाही, असेही ममता यांनी म्हटले आहे. सीएएसाठी अर्ज करणारा विदेशी होईल. यासाठी कोणीही अर्ज करू नयेत, अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे.
 
ममता म्हणाल्या, भाजप म्हणतेय ’४०० पार ’; पण मी त्यांना आधी २०० जागांचा टप्पा पार करण्याचे आव्हान देते. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत २०० हून अधिक जागा येणार असल्याचे सांगितले, मात्र त्यांना ७७ वरच थांबावे लागले. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दुखापतीनंतर त्यांनी आता रविवारी फेरी काढत सभा घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. सीएए हे नागरिकांना विदेशी बनवण्याचे जाळे आहे. आम्ही पश्चिम बंगालमध्ये सीएए लागू करू देणार नाही असे सांगितले आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजपसोबत हातमिळवणी केल्याबद्दल ममतांनी इंडिया आघाडीच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) आणि काँग्रेसवर टीका केली.
 

Related Articles