हजारो चिनी कर्मचारी पाकिस्तान सोडणार   

इस्लामाबाद : दहशतवादी हल्ल्यामुळे चीनचे कर्मचारी घाबरले असून त्यांनी आता सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. 
सुरक्षेसंदर्भात केलेल्या पाहणीत ही बाब प्रकर्षाने आढळून आली आहे. महम्मद अमीर राणा यांनी या संदर्भातील लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध केला आहे. चिनी अभियंते प्रवास करत असलेल्या वाहनावर नुकताच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.  त्यात पाच जण  ठार झाले होते. त्यामुळे त्यांच्या घबराट पसरली आहे. डासू जलविद्युत प्रकल्पात ते काम करत होते. अशा प्रकारचे तीन प्रकल्प सुरू आहेत. कर्मचार्‍यांनी हल्ल्यानंतर काम बंद केले आहे. चीनच्या दृष्टीने प्रकल्प महत्वाचा आहे. त्यामुळे त्याला प्राधान्य दिले जात आहे. एकंदरीत हल्ल्यामुळे कर्मचार्‍यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे त्यांनी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतल्याचे लेखात नमूद केले आहे. पाकिस्तानात चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर प्रकल्प वेगाने सुरू आहे. या प्रकल्पात चीनचे हजारो कर्मचारी काम करत आहे. बलुचिस्तानातून तो प्रकल्प जात आहे. तेथे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारे चिनी नागरिक आणि प्रकल्पावर वारंवार हल्ले चढवत आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य धोक्यात आले आहे. सर्वच प्रकारच्या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करावा, असा इशारा नुकताच चीनने पाकिस्तानला दिला होता.

Related Articles