’ट्रान्सजेंडर डे ऑफ व्हिजिबिलिटी’वरून ट्रम्प समर्थकांची बायडेन यांच्यावर टीका   

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ३१ मार्चला ’ट्रान्सजेंडर डे ऑफ व्हिजिबिलिटी’ म्हणून घोषित केल्याने त्यांना माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार पथकाकडून आणि धार्मिक, परंपरावादी यांच्याकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे. कारण या दिवशी ’इस्टर संडे’ देखील आहे.
 
डेमोक्रॅटिक अध्यक्षांनी शुक्रवारी ही घोषणा केली, आपल्या देशातील ट्रान्सजेंडर लोकांचे जीवन सुधारण्यासाठी, त्यांचा आवाज वाढवण्यासाठी आणि लिंग ओळखीवर आधारित हिंसाचार आणि भेदभाव संपवण्यासाठी सर्व अमेरिकन नागरिकांनी आमच्यात सामील झाले पाहिजे. आपण एकत्र काम केले पाहिजे.
 
या वर्षी इस्टरदेखील ३१ मार्च रोजी येत आहे, जो ख्रिश्चन समुदायाच्या सर्वात पवित्र सणांपैकी एक आहे. ख्रिश्चन धर्माच्या रोमन कॅथलिक पंथाचे अनुसरण करणार्‍या बायडेन यांच्यावर ट्रम्प यांच्या समर्थकांकडून धर्माबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप केला आणि रिपब्लिकन पक्षाने त्याला पाठिंबा दिला. 
 
ट्रम्प मोहिमेच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी शनिवारी सांगितले की, आम्ही जो बायडेन यांच्या प्रचार पथकाला आणि व्हाईट हाऊसला अमेरिकेतील लाखो कॅथलिक आणि ख्रिश्चनांची माफी मागण्यासाठी आवाहन करतो. एक गोष्ट साजरी करण्याचा हा ’इस्टर संडे’चा दिवस आहे. ते येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान आहे. गेल्या काही वर्षांपासून ख्रिश्चन धर्मावर झालेल्या कथित हल्ल्याबद्दल त्यांनी बायडेन प्रशासनालाही धारेवर धरले.यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन नेते माईक जॉन्सन यांनी समाज माध्यमावर सांगितले की, व्हाईट हाऊसने इस्टरच्या महत्त्वपूर्ण तत्त्वाचा विश्वासघात केला आहे. त्यांनी बायडेन यांच्या निर्णयाला ’अपमानजनक आणि घृणास्पद’ म्हटले आहे.
 

Related Articles