सीरियाच्या अजाझ प्रांतात बॉम्बस्फोट; ८ ठार   

बेरूत : तुर्की समर्थक सैन्याने ताब्यात घेतलेल्या उत्तर सीरियन शहरातील एका बाजारपेठेत रविवारी सकाळी बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या वॉर मॉनिटरने ही माहिती दिली.
 
सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सने सांगितले की, अलेप्पो प्रांतातील अजाझ येथील बाजारपेठेत एका मोटारीत हा बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटात आठ जण ठार तर २३ जण जखमी झाले होते. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. तुर्की सैन्याने आणि त्यांच्या सीरियन प्रॉक्सींनी सीमेचा मोठा भाग काबीज केला आहे. ज्यामध्ये अजाझ सारखी अनेक प्रमुख शहरांचा समावेश आहे. सरकारने शांततापूर्ण मार्गाने याला विरोध करणार्‍यांचे आंदोलन दडपल्यानंतर २०११ मध्ये सीरियाचे युद्ध सुरू झाले. कालांतराने त्यात बदल होऊन जिहादी आणि परदेशी सैन्याचा समावेश झाला. 
 

Related Articles