उत्तराखंडमध्ये मोटार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू; ११ जखमी   

नवी टिहरी : उत्तराखंडमधील टिहरी जिल्ह्यात रविवारी मोटार दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले.नरेंद्रनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी गोपाल भट्ट यांनी सांगितले की, ही घटना गजा तहसीलमधील गजा-दंडचाली-चंबा रस्त्यावर दुवाकोटीधरजवळ सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही मोटार चंब्याच्या दिशेने जात होती, यात १४ जण होते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी खड्ड्यात पडली. धरमवीर अस्वाल (४५) आणि रितिका (२२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर जगवीर सिंग रावत (४०) यांचा गाझा येथील रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींवर गाझा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरितांना जखमींना ऋषिकेश येथील एम्समध्ये दाखल करण्यात आल्याचे भट्ट सांगितले.

Related Articles