भाजपमधील बंडाळीमुळे मंडीत कंगनाचा मार्ग खडतर   

शिमला : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने अभिनेत्री कंगना राणावत उमेदवारी दिली आहे. कंगनाने शुक्रवारी प्रचार फेरी काढत निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. परंतु भाजपमधील बंडखोर आणि राजघराण्यामुळे कंगना रणौतचा मार्ग अवघड होऊ शकतो. माजी राजघराण्याचे वंशज महेश्वर सिंह यांनी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठांना कंगना यांना तिकीट देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगितले आहे. महेश्वर सिंग हे भाजप हिमाचलचे अध्यक्ष आणि तीन वेळा खासदार राहिले आहेत.
 

बंडखोर आणि राजघराण्याचा त्रास वाढला

 
भाजपविरोधात बंडखोरी करून २०२२ ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार्‍या उमेदवारांनीही मोर्चेबांधणी केली आहे. त्यांनी रणनीती तयार करण्यासाठी बैठक घेतली. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होट करणारे काँग्रेसचे बंडखोर आमदार रवी ठाकूर यांना लाहौल आणि स्पिती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तिकीट देण्याच्या विरोधातही आंदोलन सुरू झाले आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री रामलाल मार्कंडा यांनी त्यांच्या समर्थकांसह पक्षाचा राजीनामा दिला आहे. यावेळी बोलताना मार्कंडा म्हणाले, मी माझ्या समर्थकांसह भाजपला रामराम केले आहे. विधानसभेची निवडणूक लढविण्याबाबतही त्यांनी यावेळी भाष्य केले. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचे संकेत त्यांनी दिले. मंडी लोकसभा मतदारसंघातील १७ विधानसभा जागांपैकी आठ अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. मंडी लोकसभा मतदारसंघात पूर्वीच्या राजघराण्यांचा मोठा प्रभाव आहे.
 
भाजपकडून तिकीट न मिळाल्याने तिघांनीही २०२२ ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. काँग्रेस अध्यक्षा आणि मंडीच्या विद्यमान खासदार प्रतिभा सिंग या आधीच तिकीटाच्या शर्यतीतून बाहेर पडल्या होत्या. जमिनीची स्थिती चांगली नसल्यामुळे कामगार निराश झाल्याचा दावा त्यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या पत्नी आणि हिमाचल प्रदेशचे पीडब्ल्यूडी मंत्री विक्रमादित्य सिंग यांच्या आई प्रतिभा यांनी कंगना यांना भाजपचे उमेदवार घोषित केल्यानंतर त्यांची भूमिका बदलली आहे.
 
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या शद्बाचे पालन करावे असे त्यांनी शुक्रवारी सांगितले. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्याशी जनातेचे भावनिक नाते आहे, आणि त्यामुळेच जनता आमच्या कुटुंबाला नेहमी लक्षात ठेवतात. आम्ही पाठिंबा देतो तुम्ही निवडणूक लढवा असे त्यांचे म्हणणे आहे. कारगिल युद्धाचे नायक आणि भाजप नेते खुशाल ठाकूर यांनी कंगनाला पाठिंबा दिल्याने ही तिच्यासाठी दिलासादायक बाब आहे.ठाकूर म्हणाले, मी कंगनाला पाठिंबा देतो. मंडी लोकसभा मतदारसंघात एक लाखाहून अधिक माजी सैनिक आहेत. पहिल्या निवडणूक सभेला संबोधित करताना कंगना यांनी स्वत:ला मंडीतील जनतेची ’मुलगी आणि बहीण’ असे वर्णन केले होते.
 

वरिष्ठांनी निर्णयाचा फेरविचार करावा : सिंग

 
राजघराण्याच्या वंशजांनी १९ पैकी १३ निवडणुका जिंकल्या आहेत, ज्यात दोन पोटनिवडणुकांचा समावेश आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते महेश्वर सिंग यांनी दिल्लीतील वरिष्ठांना कंगना यांना तिकीट देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली. भाजपकडून तिकिटाचे आश्वासन मिळाल्याचा दावा त्यांनी केला. सिंग यांनी शनिवारी सांगितले की, कंगनाने पक्षासाठी कोणतेही योगदान दिलेले नाही. मंडईतील लोक आवाज उठवत आहेत आणि समाज माध्यमावर या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करत आहेत. या निर्णयाच्या फेरविचारासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे. कंगना यांना उमेदवार बनवण्याच्या घोषणेनंतर महेश्वर सिंग यांचा मुलगा हितेश्वर सिंग यांनी सभा घेतली. भाजपचे माजी सरचिटणीस राम सिंग आणि माजी आमदार किशोरी लाल यांच्यासह अनेक नेतेही या बैठकीला उपस्थित होते.
 

Related Articles