गरिबांना घरे, महिलांना वर्षाला एक लाख रुपये   

आंध्र प्रदेशसाठी काँग्रेसची नऊ आश्वासने

 
अमरावती : आंध्र प्रदेशात काँगे्रस सत्तेत आल्यास प्रत्येक गरीब कुटुंबाला पक्के घर, तसेच महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना महिन्याला ८ हजार ५०० रुपये म्हणजेच वर्षाला १ लाख रुपये देऊ, असे आश्वासन आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रमुख वाय. एस. शर्मिला यांनी दिले.आंध्र प्रदेशात १३ मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जनतेला नऊ आश्वासने देण्यात आली आहेत. वाय. एस. शर्मिला यांनी या आश्वासनांची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तेवर आल्यास आंध्र प्रदेशला १० वर्षांसाठी विशेष श्रेणीचा दर्जा दिला जाईल. प्रत्येक गरीब कुटुंबाला ८ हजार ५०० रुपये महिन्याला म्हणजेच वार्षिक १ लाख रुपये दिले जातील. ही रक्कम महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दिली जाणार आहे. शेतकर्‍यांचे दोन लाख रुपयांचे कृषी कर्ज माफ केले जाईल. 
 
किमान आधारभूत किमतीवर शेतकर्‍यांना अतिरिक्त ५० टक्के, रोजगार हमी योजनेंतर्गत किमान वेतन ४०० रुपये प्रतिदिन, बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण मोफत दिले जाईल. तसेच प्रत्येक गरीब बेघर कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रुपये किमतीचे घर, लाभार्थ्यांना प्रत्येकी ४ हजार रुपये मासिक सामाजिक सुरक्षा पेन्शन 
आणि अपंगांना प्रत्येकी ६ हजार रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
 

Related Articles