हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करा   

भाजप आमदार तानाजी मटकुळे यांची मागणी

 
हिंगोली : हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजप आमदार तानाजी मटकुळे यांनी जोरदार विरोध केला असून, पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. भाजप पदाधिकार्‍यांची हिंगोलीत आढावा बैठक झाली. या बैठकीला भाजप आमदार नामदेव ससाने, आमदार तानाजी मुटकुळे व आमदार भीमराव केराम उपस्थित होते. बैठकीत हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरुन नाराजी व्यक्त करण्यात आली. पाटील यांची उमेदवारी रद्द करून हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचा उमेदवार देण्यात यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. शिंदे गटाला हे मान्य नसेल तर भाजपच्या उमेदवाराला धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविण्यास सांगावे, आम्ही ही जागा निवडून आणू असा ठराव देखील या बैठकीत करण्यात आला. यावेळी हेमंत पाटील यांच्या उमेवारीविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
 

Related Articles