किस्से निवडणुकीचे   

शिक्का मतपत्रिकेऐवजी टेबलवर

 
भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका १९५२ मध्ये झाल्या. त्या वेळी मुंबई आणि गुजरात राज्य एकत्र होते. पहिल्या निवडणुकीच्या वेळी लोकांमध्ये अतिशय उत्साह होता. अनेक लोक बैलांना झुली घालून, बैलगाड्या रंगवून निवडणुकीला गेल्याचे जुने लोक सांगतात. मतदानाच्या वेळी प्रबळ विरोधक नसल्यामुळे बहुतेक बूथवर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मर्यादित संख्येने हजर असत. मतपत्रिका देऊन टेबलवर जाऊन योग्य त्या नावासमोर व चिन्हावर शिक्का मारा असे सांगितलेतरी बरीच माणसे मतपत्रिका तशीच बाजूला ठेवून टेबलवर शिक्का मारत असत.
 

हत्तीवरून प्रचार...

 
१९५२ पासून १९९७ पर्यंत भारतात छापील मतपत्रिका वापरून निवडणुका घेतल्या गेल्या. निवडणुकांमध्ये उमेदवारांचे चिन्ह असणारे प्राणी, पक्षी, वस्तू यांचा प्रचारात वापर करताना अनेक गमती-जमती घडत. मतदारांना पुन्हा पुन्हा आठवण करून देण्यासाठी आणि कायमचे लक्षात राहण्यासाठी उमेदवार अनेक शक्कल लढवत असत. १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत हत्ती चिन्ह असणार्‍या एका उमेदवाराने हत्तीवर बसून प्रचार केला होता. याच हत्तीला सोंडेमध्ये मोठा पेपर पकडायला दाखवून जवळच्या बॉक्समध्ये टाकायला शिकवले गेले होते.
 

Related Articles