बोरी खुर्दमध्ये आढळले बिबट्याचे तीन बछडे   

बेल्हे, (वार्ताहर) : बोरी खुर्द येथील सिताराम यशवंत शेटे या शेतकर्‍याच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे तीन बछडे आढळल्याने ऊसतोडणी मजुरांची धांदल उडाली.रविवारी सकाळी नऊ वाजता बोरी खुर्द येथील सिताराम यशवंत शेटे यांच्या ऊसाच्या शेतात बछडे आढळून आले. त्यानंतर बिबट्याच्या मादीच्या भीतीपोटी मजुरांनी ऊस तोडणी थांबवली. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन बछडे ताब्यात घेतले. त्यानंतर सुरक्षितेसाठी त्यांना माणिकडोह बिबट्या निवारा प्रकल्पात ठेवण्यात आले. ते बछडे त्यांच्या आईच्या कुशीत वसण्यासाठी पुन्हा त्याच ऊसाच्या फडात सोडण्यात येणार होते. 

Related Articles