विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत विद्यापीठाची सावधगिरीची सूचना   

पुणे :  पुण्यात देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. काही वेळा आज्ञानामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना काय काळजी घ्यावी, याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे  विद्यार्थ्यांना अलर्ट दिला जाणार आहे. लवकरच या संदर्भातील पत्रक विद्यापीठातर्फे प्रसिध्द करण्यात येणार आहे. 
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अस्मा या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटने एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याची माहिती नुकतीच समोर आली. विद्यार्थ्यांनी कोणतीही माहिती न घेता एका बियर बारच्या समोरील हॉटेलसारख्या इमारतीमध्ये एमबीए अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. मात्र, वर्षभरानंतर आपली त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. मात्र, केवळ या कारणांमुळेच नाही तर विद्यार्थ्यांची कोणीही आर्थिक किंवा शैक्षणिक फसवणूक करू नये, या उद्देशाने विद्यार्थ्यांना अलर्ट देण्यात येणार आहे. 
 
विद्यापीठाकडून दिल्या जाणार्‍या अलर्टमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना संबंधित महाविद्यालयाविषयी कोणती माहिती जाणून घ्यावी. महाविद्यालय विद्यापीठाशी संलग्न आहे किंवा नाही, प्रवेश घेत असलेल्या अभ्यासक्रमाचे शुल्क किती आहे. संबंधित अभ्यासक्रमाला विद्यापीठाची मान्यता आहे किंवा नाही, अशा अनेक बाबींची माहिती विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना अलर्टद्वारे दिली जाणार आहे. 
 

Related Articles