कोहली आयपीएल २०२४ चा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज   

बंगळुरु : विराट कोहलीने ब्रेकनंतर आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. त्याने ३ डावात १८१ धावा ठोकल्या असून त्याची सरासरी ही ९०.५० अन् स्ट्राईक रेट हे १४१.४० इतके आहे. कोणीही म्हणेल की विराट कोहलीची ही टी २० क्रिकेटमधील बेस्ट फिगर आहेत. विराट कोहली सध्या आयपीएल २०२४ चा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज झाला आहे. त्याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. विराटचे चाहते त्याच्या कामगिरीवर खुश आहेत. मात्र तरी देखील बीसीसीआयचे निवडसमिती सदस्य चिंतेत आहेत. विराट कोहलीने केकेआरविरूद्ध ५९ चेंडूत ८३ धावांची दमदार खेळी केली. तरी निवडसमिती खुश का नाही.
 
विराट कोहलीला भारतीय संघातून वगळणे अशक्य आहे. त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे त्याला संघातून गळणे शक्य नाही. आयपीएल २०२३ मध्ये त्याने ६३९ धावा केल्या होत्या. आयपीएल २०२४ मध्ये तो पुन्हा धावांचा रतीब घालतोय. जून महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडीजमध्ये टी २० वर्ल्डकप खेळणार आहे.

Related Articles