गुजरात टायटन्सचा हैदराबादवर विजय   

अहमदाबाद : गुजरात टायटन्सने आपल्या घरच्या मैदानावर विजयाचा धडाका कायम ठेवला. त्यांनी सनराईजर्स हैदराबादचा ७ बळींनी पराभव करत आपला दुसरा विजय प्राप्त केला. हैदराबादने गुजरातसमोर १६३ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान गुजरातने ३ बळीच्या मोबदल्यात १९.१ षटकात पार केले. गुजरातकडून साई सुदर्शनने ४५ तर डेव्हिड मलिरने नाबाद ४५ धावा केल्या. 
 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या सनराईजर्स हैदराबादला गुजरात टायटन्सने १६२ धावांत रोखले. गुजरातकडून अभिषेक शर्मा आणि अब्दुल समादने सर्वाधिक २९ धावा केल्या. गुजरातच्या भेदक मार्‍यासमोर हैदराबादच्या एकाही फलंदाजाला ३० धावांच्या पुढे धावा केल्या नाहीत. गुजरातकडून सर्व गोलंदाजांनी चांगला मारा केला. मात्र मोहित शर्माने स्लॉग ओव्हरमध्ये दमदार मारा करत ४ षटकात २५ धावा देत ३ बळी घेतल्या. 
 
डेव्हिड मिलरने १९.१ षटकात षटकार मारत सनराईजर्स हैदराबादचे १६३ धावांचे टार्गेट गुजरातला पूर्ण करून दिले. गुजरात टायटन्सने सनराईजर्स हैदराबादचा ७ बळींनी पराभव केला. शुभमन गिल ३६ धावा करून बाद झाल्यानंतर साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर यांनी भागीदारी रचत संघाला १५ षटकात ११४ धावांपर्यंत पोहचवले. गुजरातला विजयासाठी ३० चेंडूत ४९ धावांची गरज आहे. शाहबाज अहमदने गुजरात टायटन्सला मोठा धक्का दिला. सलामीवीर वृद्धीमान साहा १३ चेंडूत २५ धावा करून खेळत होता. त्याला पॅट कमिन्सकरवी झेलबाद केले. गुजरातने ५ षटकात १ बाद ४५ धावा केल्या आहेत.
 
गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने शेवटच्या षटकात फक्त ३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्यामुळे सनराईजर्स हैदराबादला २० षटकात ८ बाद १६२ धावांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादचा माजी कर्णधार एडेन मार्करमही या सामन्यात फार काही करू शकला नाही. क्लासेन पाठोपाठ तोही १५ व्या षटकात बाद झाला. त्याला उमेश यादवने टाकलेल्या चेंडूवर मार्करम राशिद खानकडे झेल देत बाद झाला. मार्करमने १९ चेंडूत १७ धावा केल्या. 
 
मार्करम हैदराबादच्या ५ व्या बळीच्या रुपात बाद झाला. हैदराबादने १५ षटकात ५ बाद १२२ धावा केल्या. हैदराबादचा विस्फोटक फलंदाज हेन्रिक क्लासेनने आक्रमक सुरुवात केली होती. त्याने नूर अहमदविरुद्ध लागोपाठ दोन षटकारही ठोकले होते. परंतु त्याला १४ व्या षटकात राशिद खानने त्रिफळाची केले. 
 
क्लासेनने १३ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावा केल्या.  हैदराबादने १४ षटकात ४ बाद १०९ धावा केल्या आहेत. हैदराबादकडून तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या अभिषेक शर्माला मोहित शर्माने बाद केले. 
 
अभिषेकने फलंदाजीला आल्यानंतर आक्रमक सुरुवात केली होती. परंतु, नंतर त्याच्या फलंदाजीला लगाम लागला. त्याला १० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहितने अभिषेकला २९ धावांवर शुभमन गिलच्या हातून झेलबाद केले. हैदराबादने १० षटकात ३ बाद ७४ धावा केल्या.
 
अग्रवालला ओमरझाईने बाद केल्यानंतर सलामीवीर ट्रेविस हेडचा अडथळा नूर अहमदने दूर केला. ७ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हेडने स्लॉग स्विप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅट आणि पॅडच्या मधून जात चेंडूने त्याचा मधला स्टंप उडवला. त्यामुळे हेड १४ चेंडूत १९ धावा करून बाद झाला. हैदराबादने ८ षटकात २ बाद ६४ धावा केल्या. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादकडून मयंक अग्रवाल आणि ट्रेविस हेड यांनी सलामीला सुरुवात केली होती. परंतु, ३४ धावांच्या सलामी भागीदारीनंतर मयंकला पाचव्या षटकात अझमतुल्ला ओमरझाईने दर्शन नळकांडेच्या हातून झेलबाद केले. मयंकने १७ चेंडूत १६ धावांची खेळी केली.

Related Articles