रेल्वेतील पँट्री कार बंद होणार   

वृत्तवेध 

 
लांबच्या प्रवासात रेल्वे प्रवासी नेहमी जेवणाची ऑर्डर देतात; पण आता रेल्वे मधील स्वयंपाकाचा संपूर्ण नियमच बदलणार आहे. जून महिन्यापासून भारतीय रेल्वेच्या पँट्री कारमध्ये प्रवाशांसाठी जेवण तयार केले जाणार नाही. पँट्रीचा वापर गरज असेल तेव्हाच पाणी गरम करण्यासाठी केला जाईल.
 
पुढील काळात ‘आयआरसीटीसी’चे बेस किचन बंद राहतील. पँट्री कारमध्ये स्वयंपाक बंद करण्यासोबतच रेल्वे स्थानकांच्या आसपास असलेले ‘आयआरसीटीसी’चे बेस किचनही बंद करण्याची तयारी सुरू आहे. रेल्वे क्लस्टरवर पँट्री कार चालवण्याच्या तयारीत आहे. तिथे प्रवाशांसाठी जेवण आणि नाश्ता तयार केला जाईल. सध्या ‘वंदे भारत’ ट्रेनमध्येही अशीच व्यवस्था आहे. तिथे फक्त पाणी गरम करण्याची व्यवस्था आहे. इतर खाद्यपदार्थ प्रवाशांना बाहेरून तयार करून दिले जातात. या बदलाबाबत भारतीय रेल्वेचे म्हणणे आहे की  प्रवाशांना चांगल्या दर्जाचे जेवण देण्यासाठी हे बदल केले जात आहेत. वेगवेगळ्या एजन्सींना वेगवेगळ्या मार्गावर पँट्री कार चालवण्याचे काम दिले जाईल, जेणेकरून अन्नाचा दर्जा सुधारता येईल.
 
एका मार्गावरील केवळ पाच ते सात गाड्यांमध्ये जेवण देण्याची जबाबदारी एका एजन्सीवर असेल. ‘आयआरसीटीसी’ने उज्जैनमधील महाकाल आणि ओंकारेश्वरला भेट देण्यासाठी खास टूर पॅकेज आणले आहे.  विक्रेत्यांनी गाड्यांमध्ये एमआरपीपेक्षा जास्त दराने वस्तू विकल्याच्या तक्रारी आल्यास त्यावर त्वरित कारवाई केली जाईल. या एजन्सींना रेल्वे स्थानकांजवळ बेस किचन तयार करावे लागतील. जेवण तयार करून ते प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी एजन्सींवर असेल. रेल्वेने एजन्सींकडून निविदा मागवल्या आहेत. एजन्सींकडून घेण्यात येणार्‍या अन्नाची चाचणी केली जाऊ शकते आणि स्वयंपाकघराची कधीही तपासणी केली जाऊ शकते; जेणेकरुन जेवणाच्या दर्जाशी तडजोड होणार नाही.

Related Articles