व्हॉट्सऍप कट्टा   

निवडणूक प्रचारावेळी
 
नेताजी : आताच तर खरी वेळ आली आहे.
जनता : तुम्ही आम्हाला लुटुन खाणार का?
नेताजी : नाही. मुळीच नाही.
जनता : आमच्यासाठी काम कराल का?
नेताजी : हो, ते तर होणारच आहे.
जनता : महागाई वाढवाल का?
नेताजी : याविषयी विचार पण करु नका.
जनता : तुम्ही आम्हाला रोजगार द्याल का?
नेताजी : नक्कीच. मला तेच तर करायचं होतं. 
जनता : तुम्ही भ्रष्टाचार तर नाही ना करणार?
नेताजी : पागल झाले का? बिलकुल नाही.
जनता : आम्ही तुमच्यावर विश्वास करु शकतो का?
नेताजी : हो, आणखी बोला...
जनता : तुम्ही महान आहात नेताजी!
निवडून आल्यानंतर आता खालून वर वाचत जा..
--
एप्रिल फुल 
 
आज १ एप्रिल आजचा दिवस संपूर्ण जगात एप्रिल फुल म्हणून साजरा केला जातो. फुल म्हणजे मूर्ख. या दिवशी लोक एकमेकांना मूर्ख बनवतात. या प्रथेची सुरवात कधी झाली हे निश्चितपणे सांगता येणार नाही. याबाबत अनेक कथा प्रचलित आहे. एका फ्रेंच कथेनुसार पंधराव्या शतकात फ्रान्समध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरत होते त्या कॅलेंडरप्रमाणे नववर्षाची सुरवात २५ मार्च ते १ एप्रिल या आठवड्यात होत असे. या आठवड्यात सगळे लोक वसंत ऋतूचे स्वागत आणि १ एप्रिलला नववर्ष साजरे करीत असत. मात्र १५८२ सालापासून फ्रेंच लोकांनी ग्रेगरियन कॅलेंडर स्वीकारले. या कॅलेंडरनुसार १ जानेवारीपासून पासून नववर्षाचा प्रारंभ होतो. हा बदल तेथील ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना माहीत नव्हता ते १ एप्रिलाच नववर्ष साजरा करीत. त्यामुळे या लोकांना तेथील उच्चभ्रू, सुशिक्षित लोक मूर्ख म्हणत. जे लोक १ एप्रिलला नववर्ष साजरा करीत त्यांना फ्रान्ससमध्ये एप्रिल फुल असे संबोधले जाई. अशा तर्‍हेने १ एप्रिलला एप्रिल फुल करण्याची प्रथा जगभर पसरली. फ्रेंच लोक भारतात आल्यानंतर भारतातही ही प्रथा सुरू झाली. १ एप्रिलला आपले मित्र, नातेवाईक यांना एप्रिल फुल करण्याची प्रथा आता चांगलीच रुजली आहे. दुसर्‍यांना एप्रिल फुल बनवताना प्रत्येकाने स्वतःमधील वाईट प्रवृत्तीलाही एप्रिल फुल बनवावे. दररोज उशिरा उठण्याच्या सवयीला लवकर उठून व्यायाम करून एप्रिल फुल करावे. दररोज मोबाईल वापराच्या सवयीला एप्रिल फुल करून एखादे छानसे पुस्तक वाचावे. गरजवंताला मदत करून स्वार्थाला एप्रिलफुल करावे. स्वतःच्या मी पणाला एप्रिलफुल करुन आम्ही बनून समाजात वावरल्यास एकमेकांविषयी असलेली कटुता कमी होईल.
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे
--
जर सकाळी लवकर उठल्याने
ताकत, बुद्धि आणि धन वाढते - तर पेपर विक्रेता आणि दूधवाला सर्वात मोठे श्रीमंत असते ! तेव्हा
झोपून राहत जा आणि जीवनाचा आनंद घ्या...
--
माणूस दिसायला इतका खराब नसतो,
जितका तो आधार कार्डावर दिसतो,
अन्...
इतका देखणा ही नसतो जितका तो
व्हॉट्सअपच्या डीपीमधे दिसतो.
माणूस इतका वाईट पण नसतो,
जितका त्याची बायको समजते..
अन्...
इतका चांगला पण नसतो, 
जितकी त्याची आई समजते !
पण,
तो नक्की कसा असतो?
हे फक्त त्याच्या मित्रांनाच ठाऊक असते.
--
परदेशी नवरे बायकोने केलेला स्वंयपाक...
‘काट्याने‘ खातात, तर भारतीय नवरे?
‘मु-काट्याने‘
--
कृपया,
एप्रिल फुलचे लांबलचक मेसेज पोस्ट करू नये.
फक्त
‘बायको माझं ऐकते’ इतकंच लिहावे
आम्ही समजून घेऊ.

Related Articles