आयसिस चढविणार जगभर दहशतवादी हल्ले   

गुप्तचर विभागाचा इशारा

नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया (आयसिस) जगभरात दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे.दहा वर्षांपूर्वी रमजानच्या सणावेळी खिलापत जाहीरनामा आयसिसने जाहीर केला होता. त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले चढवून सामूहिक हत्याकांड घडवून आणण्याचे आवाहन केले आहे. दहशतवाद हल्ले करण्यासाठी जगभरातील लढवय्यांनी संघटनेत सामील होण्याचे आवाहन केले आहे.

संघटनेचा प्रवक्ता अबु हदायफाह अल अन्सारी याने याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. दहशतवाद काही क्षेत्रापुरता मर्यादित ठेवायचा नसून तो जागतिक पातळीवर पसरविण्याचे स्वप्न संघटनेने पाहिले आहे. इराक, सीरियासह अगदी दक्षिण आफ्रिकेतील मोझांंबिकपर्यंत दहशतवादी हल्ले चढवावेत, असा निर्धार केला आहे. जगभर इस्लाम धर्म पसरविण्याचा निर्धार केला आहे. त्यात व्यक्ती, समूह आणि विविध देशांत हल्ले करण्याचे ठरविल्याचे सांगण्यात आले. रशियाची राजधानी मॉस्को येथील हल्ल्याप्रमाणे दहशतवादी हल्ले घडविण्याचा इशारा दिला आहे.

Related Articles