ट्रम्प यांना सत्तेपासून रोखा; विविध राष्ट्रप्रमुखांचा आग्रह   

बायडेन यांचा गौप्यस्फोट

न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखावे, अशी मागणी माझ्याकडे विविध देशांच्या प्रमुखांनी केली होती, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी केला.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ४ नोव्हेंबर रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर एका प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि बिल क्लिटंन उपस्थित होते. दोघांनीही बायडेन यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. त्यांनीही ट्रम्प यांचा पराभव करा, असे आवाहन केले.  

बायडेन म्हणाले, भारतात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या जी २०  परिषदेवेळी विविध देशांच्या प्रमुखांनी मला सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प हे लोकशाहीसाठी धोकादायक आहेत. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदावर पुन्हा निवडून येण्यापासून रोखा. ट्रम्प हे आक्रस्ताळी, पाताळयंत्री आहेत, असे सांगताना ते म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारात ते उघडपणे सांगतात की, त्यांचा पराभव झाला तर रक्तपात अटळ आहे. हा कसला उमेदवार आहे. त्यांचे वक्तव्य अतिशय गंभीर आहे. आता मला माझीच चिंता वाटू लागली आहे.

जी २० परिषदेवेळीं अनेक नेत्यांच्या गाठीभेटी मी घेतल्या. तेव्हा  त्यांनी माझे हात हातात घेतले आणि अतिशय कळवळून सांगितले की, तुम्ही ट्रम्प यांना पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखा. त्यावर मी त्यांना सांगितले की, मी लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे.

 

Related Articles