रशियात सहा पत्रकार ताब्यात   

मॉस्को : रशिात सहा पत्रकारांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक अलेक्सी नवाल्नी यांच्या खटल्याचे वार्तांकन करणार्‍या एका पत्रकाराचा समावेश आहे.

अलेक्सी नवाल्नी यांच्या प्रकरणी अ‍ॅटोनिया फाव्हरसक्या यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी समाज माध्यमांवर नवाल्नी यांचा उदोउदो करणार्‍या पोस्ट टाकल्या होत्या. त्यामध्ये नावाल्नी भ्रष्टाचार विरोधी मंच, मानवाधिकार संघटना यांच्याबाबतचा तपशील होता. काही दिवसांपूर्वी नवाल्नी यांचा तुरुंगात मृत्यू झाला होता. नवाल्नी यांच्या मृत्यूपूर्वी  खटल्याच्या सुनावणी संदर्भातील चित्रफिती समाज माध्यमांवर टाकल्याचा आरोप ठेवला आहे. दरम्यान, अध्यक्षपदी पुतीन पुन्हा निवडून आल्यानंतर पत्रकारांवर करावाई सुरू केली आहे. त्याअंतर्गत सहा पत्रकरांना आता ताब्यात घेतले आहे.

 

Related Articles