नेदरलँडमध्ये इमारतीत नागरिकांना ठेवले ओलीस   

एडे : नेदरलँडमध्ये एका इमारतीत काही नागरिकांना ओलीस ठेवल्याची घटना घडली आहे. यानंतर सशस्त्र पोलिसांनी घटनास्थळी शनिवारी धाव घेतली आणि परिसर नागरिक मुक्त केला. नेदरलँडच्या एडे शहरात हा प्रकार घडला आहे. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. इमारतीत किती नागरिकांना ओलीस ठेवले आहे ? याबाबतचा तपशील उपलब्ध झालेला नाही. सेंट्रल चौकात घडलेल्या घटनेमुळे परिसरातल १५० घरे पोलिसांनी निर्मनुष्य केली होती. अ‍ॅमस्ट्रडमपासून सुमारे ८५ किलोमीटरवर एडे शहर आहे.

Related Articles