अरुणाचलमध्ये भाजपचे दहा उमेदवार बिनविरोध   

इटानगर : अरुणाचल विधानसभा निवडणुकीत भाजपचे दहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री चाऊना मिना यांचा समावेश आहे, असे अधिकार्‍यांनी शनिवारी सांगितले. राज्यात विधानसभेच्या ६० जागा आहेत. त्यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, ९ जागांसाठी केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला. ते नऊ अर्ज भाजप उमेदवारांनी दाखल केले होते. तर एका ठिकाणी दोन अर्ज़ दाखल झाले. त्यात भाजप आणि काँग्रेस उमेदवाराचा समावेश होता. मात्र, काँग्रेसच्या बायमसो क्री यांनी काल उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे दहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. अन्य ५० जागांसाठी १९ रोजी मतदान होईल.

Related Articles