राजनाथ सिंह भाजपच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख   

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी जाहीरनामा समिती जाहीर केली. या समितीमध्ये २७ सदस्यांचा समावेश आहे. तर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे समितीचे प्रमुख असतील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन समितीच्या संयोजक तर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे सह-संयोजक असतील.
या समितीच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांकडून सूचना मागविल्या जातील. त्यावर, समिती विचारमंथन करेल आणि त्यानंतर अंतिम जाहीरनामा तयार करेल.

या समितीमध्ये गुजरात, आसाम आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशिवाय इतर अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या समोवश असेल. शिवराज सिंह चौहान आणि वसुंधरा राजे यांचादेखील समितीमध्ये समावेश आहे.

पक्षाचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह हेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख होते.

समितीतील अन्य सदस्य : अर्जुन मुंडा, भूपेंद्र यादव, अर्जुनराम मेघवाल, किरेन रिजीजू, अश्विनी वैष्णव, धमेंद्र प्रधान, भूपेंद्र पटेल, हिमंता विश्वसरमा, विष्णुदेव साय, डॉ. मोहन यादव, स्मृती इराणी, जुएल ओराम, रविशंकर प्रसाद, सुशील मोदी, केशव प्रसाद मौर्य, राजीव चंद्रशेखर, विनोद तावडे, राधामोहन दास अग्रवाल, मनजिंदर सिंह सिरसा, ओ.पी. धनखड, अनिल अँटनी, तारीक मंसूर.

 

Related Articles