निकाली निघालेल्या प्रकरणात पुन्हा नोटीस : शिवकुमार   

बंगळुरू : केंद्रीय संस्थांना हाताशी धरुन केंद्र सरकारकडून विरोधकांचा छळ सुरू असल्याचा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी शनिवारी केला. आधीच निकाली निघालेल्या प्रकरणात प्राप्तिकर विभागाने आपणास नोटीस बजावली असल्याचेही ते म्हणाले. कनकापुराचे आमदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले शिवकुमार यांनी काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीच्या सदस्यांना भाजप घाबरवत असल्याचे सांगितले मलाही काल रात्री प्राप्तिकर विभागाकडून नोटीस मिळाली. मात्र, जे प्रकरण आधीच निकाल निघाले आहे, त्या प्रकारणातील नोटीस पाहून मला आणि माझा स्वीय सचिव तसेच सर्वांना धक्का बसला, असे सांगितले. भाजप नेत्यांशी संबंधित अनेक प्रकरणे आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, असेही शिवकुमार म्हणाले.

Related Articles