मुख्तार अन्सारीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने   

वैद्यकीय अहवालातून स्पष्ट

लखनौ : उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड मुख्तर अन्सारी याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटका आल्याने झाला आहे. त्याच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल शनिवारी हाती आल्यानंतर ही बाब उघड झाली.

मुख्तार अन्सारी माजी आमदार होते. ६० पेक्षा अधिक गुन्हे त्याच्यावर दाखल होते. बांदा येथील तुरुंगात तो शिक्षा भोगत होता. पोटात दुखत असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा गुरूवारी रात्री मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू विष दिल्यामुळे झाल्याचा आरोप त्याच्य कुटुंबियांनी केला होता. त्याच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला ? याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अन्सारी याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत मोठ्या संख्येन नागरिक सहभागी झाले होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राज्य सरकारने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

 

Related Articles