मदरशातील शिक्षकाची हत्या   

संघाच्या तीन स्वयंसेवकांची सुटका करण्याचे आदेश

कासरगौड : केरळातील मदरशातील शिक्षकाची हत्या केल्याप्रकरणी गेल्या सात वर्षांपासून तुरुंगात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन स्वयंसेवकांची सुटका करण्याचे आदेश केरळच्या सत्र न्यायालयाने शनिवारी दिले.  स्वयंसेवकांचा हत्येत कोणताही हात नसल्याने सिद्ध झाल्याने त्यांना न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे.

कासरगौड जिल्ह्यात २० मार्च २०१७ मध्ये चौरी येथील जुम्मा मशिदीत महम्मद रियास मौलवी यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. एका खोलीत त्यांचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी  संघाच्या तीन स्वयंसेवकांना अटक केली होती. गेली सात वर्षे ते तुरुंगात होते. त्यांना जामिनही दिला नव्हता. या संदर्भातील खटल्याची सुनावणी काल पूर्ण झाली. कासरगौड येथील प्रमुख सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. के. बालकृष्णन यांनी अखिलेश, जितीन आणि अजेश (सर्व राहणार कासरगौड) यांना निर्दोष ठरविले असून त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.

तसरकारी वकील सी. शुक्कुर म्हणाले, निकाल निराश करणारा असून आदेशाला आव्हान देणार आहे. मौलवींच्या खुनात तिघांचा हात होता. एका आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळले होते. तसेच खुनासाठी वापरलेल्या चाकूवर मौलवींच्या कपड्याचा तुकडा आढळला होता. हे सर्व पुरावे आम्ही न्यायालयात सादर केले होते. विस्तृत निकाल हाती आल्यावर आम्ही निकालाला आव्हान देणार  आहोत. या प्रकरणी आरोपपत्र ९० दिवसांत दाखल झाले होते. न्यायालयाने ९७ साक्षीदार, २१५ कागदत्रे आणि ४५ पुराव्यांची शहानिशा केली होती. निकालाचे वाचन केले तेव्हा मौलवींची पत्नी उपस्थित होती. आरोपींची निर्दोष सुटका केल्याचे ऐकून त्याना अश्रू अनावर झाले. निकालाने निराशा केली असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. असा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता, अशी प्रतिक्रिया मौलवींच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली.  

दरम्यान, मौलवींच्या हत्येशी स्वयंसेवकांचा कोणताही संबंध नाही.   त्यांना गेली सात वर्षे ते तुरुंगात डांबले होते. तसेच जामीन दिला नाही. पोलिसांच्या आरोपपत्रात स्पष्ट म्हटले आहे की, परिसरात केवळ धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी मौलवींचा खून करण्यात आला होता, अशी माहिती आरोपींच्या नातेवाइकांनी माध्यमांना दिले.

 

Related Articles