आसाममधील पेट्रोल पंप चालकांचा संप मागे   

गुवाहाटी : आसामध्ये पेट्रोल पंप चालकांचा नियोजित संप बारगळला आहे. पंप चालकांनी शनिवारपासून दोन दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला होता. संप मागे घेतल्याची घोषणा पंप चालक संघटनेने केल्यामुळे ग्राहकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

पूूर्वोत्तर पेट्रोलियम डिलर असोसिएशनने इंधनाची खरेदी अथवा विक्री शनिवारी पहाटे पाच ते सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत केली जाणार नाही, असा इशारा दिला होता. डिलरचे कमिशन २०१७ पासून दिलेले नाही. ते द्यावे, अशी मागणी करून त्यांनी संपावर जाण्याचे ठरविले होते. तसा इशारा दिला होता. मात्र, सरकारने या प्रश्नी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. सरकार आणि तेलं कंपन्यांशी आता वाटाघाटी आणि चर्चा करून प्रश्न सोडविला जाईल, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, सरकारने अत्यावश्यक सेवा कायदा लागू केला जाईल, असा इशारा संपकरी पेट्रोल पंप चालक संघटनेला दिला होता. त्यानंतर संघटनेने नरमाईची भूमिका घेत आता संप मागे घेतला आहे.

Related Articles