अभिनेता डॅनियल बालाजी यांचे हृदयविकाराने निधन   

चेन्नई : प्रख्यात तामिळी अभिनेते डॅनियल बालाजी यांचे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते.तामिळनाडूतील तिरूवन-मियुरचे ते रहिवासी होते. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना कोट्टीवक्कम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तरुण वयात त्यांचा मृत्यू झाल्याबद्दल अभिनेते कमल हासन, कीर्ती सुरेश यांनी दु:ख व्यक्त केले. दूरचित्रवाणीवरील चिट्टी ही त्यांची मालिका खूपच गाजली होती. मालिकेतील डॅनियल नावाच्या एक पात्राची भूमिका त्यांनी केली होती. यामुळे ते डॅनियल या नावाने ओळखले जात होेते.अत्यंत कमी वयात त्यांचा मृत्यू झाल्यामुळे तामिळनाडूतील चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. होतकरू अभिनेता गमावला अशा शब्दात दुःख व्यक्त केले.

Related Articles