भारतीय नौदलामुळे बचावले २३ पाकिस्तानी नागरिक   

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने आक्रमक कारवाई करून इराणचा ध्वज असलेल्या नौकेतून ओलिसांची आणि २३ पाकिस्तानी खलाशांची सुटका केली आहे. समुद्र चाच्यांनी नौकेचे अपहरण केले होते. नौदलाने अपहरण विरोधी कारवाई करून ती ताब्यात घेतली.  शुक्रवारी कारवाई केली होती. नौदलाचे विशेष पथक गस्तीवर होते. तेव्हा एक मच्छिमार नौका आढळली होती. त्यावर ९ बंदूकधारी असल्याची माहिती मिळाली होती. नौका अडवून सर्व ओलीस आणि २३ पाकिस्तानी खलाशांची सुटका केली आहे.

Related Articles