भाजपकडून ११ उमेदवारांची यादी   

अमृतसरमधून तरणजित सिंधू मैदानात

नवी दिल्ली : भाजपने शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी आणखी ११ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात ओडिशातील कटकमधून भर्तृृहरी माहताप यांना तर, अमृतसरमधून अमेरिकेतील माजी राजदूत तरणजित सिंह संधू यांना उमेदवारी दिली आहे.विविध पक्षांतून काही नेत्यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. त्यामध्ये भर्तृृहरी माहताप, रवनीत सिंग बिट्टू, सुशील कुमार रिंकू आणि प्रणिती कौर यांचा समावेश आहे. या सर्वांना तिकीट दिले आहे.

वायव्य दिल्लीतून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकलेले हंस राज हंस यांना फरिदकोट मतदारसंघातून तिकीट दिले आहे. माहताप यांनी नुकताच बिजू जनता दलाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते कटक येथून रिंगणात आहेत. लुधियानातून रवनीत सिंग बिट्टू यांना तिकीट दिले आहे. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला होता. कौर यांना पतियाळातून तर रिंकू  यांना जालंधरमधून तिकीट दिले. त्या आपमधून भाजपमध्ये आल्या आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियांत सिंग यांचे बिट्टू नातू असून कौर या पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. दोघेही पूर्वी काँग्रेसमध्ये होते.

दरम्यान, भाजप रविवारी पश्चिम बंगालमधून दोन, ओडिशातून तीन आणि पंजाबमधून सहा उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे. आतापर्यंत भाजपने ४११ उमदेवार जाहीर केले आहेत.

 

Related Articles