काँग्रेसकडून राजस्तानमधील स्टार प्रचारकांची यादी जाहीर   

जयपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी काँग्रेसने राजस्तानमधील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. ४० नावांच्या या यादीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राजस्तानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सोनिया गांधी राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा, सचिन पायलट आणि कन्हैया कुमार यांचाही समावेश आहे.

मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या यादीनुसार, काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये पक्षाचे राज्य प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा, राज्य युनिटचे प्रमुख गोविंद सिंग दोतसारा, विरोधी पक्षनेते टिकाराम जुली, माजी विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी आणि ज्येष्ठ नेते मोहन यांचा समावेश आहे.  हेमाराम चौधरी, रघु शर्मा, हरीश चौधरी, आमदार डुंगाराम यांच्यासह अनेक आमदारांच्या नावांचाही या यादीत समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा ६ एप्रिल रोजी जाहीर सभेत प्रसिद्ध करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

Related Articles