ओडिशात बीजेडीला धक्का   

खासदार मोहंतींसह दोन माजी आमदारांनी पक्ष सोडला

भुवनेश्वर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी बिजू जनता दलाला (बीजेडी) शनिवारी मोठा धक्का बसला. सिनेस्टार आणि विद्यमान खासदार अनुभव मोहंती आणि दोन माजी आमदार काल बीजेडीतून बाहेर पडले.कटकचे खासदार भर्तृृहरी माहताप यांच्यानंतर प्रादेशिक पक्ष सोडणारे मोहंती हे दुसरे विद्यमान बीजेडी खासदार आहेत. माहताप यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.

अभिनेता-राजकारणी आणि माजी आमदार आकाश दास नायक यांनीही बीजेडीचा राजीनामा दिला आहे. ते कोरई रहिवाशांच्या सन्मानासाठी मी बीजेडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. तसेच, कोरईतील जनतेशी आणि समर्थकांशी चर्चा करून पुढील घेऊ, असेही त्यांनी सांगितले.भुवनेश्वर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रियदर्शी मिश्रा यांनीही बीजेडीचा राजीनामा दिला. त्यानंतर, ओडिशा भाजपचे अध्यक्ष मनमोहन सामल आणि भुवनेश्वरच्या खासदार अपराजिता सारंगी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. ओडिशाचे निवडणूक प्रभारी विजयपाल सिंह तोमर हेही यावेळी उपस्थित होते.

प्रियर्षी यांनी सकाळी बीजेडी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना राजीनामा पत्र पाठवले होते.ओडिशा प्रदेश काँग्रेस समितीचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि माजी आमदार चिरंजीबी बिस्वाल यांनी काँग्रेस सोडली आहे. ते बीजेडीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान, परलाखेमुंडी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार के. सूर्या राव यांनी काल भुवनेश्वरमधील बीजेडी मुख्यालयात राज्यसभा खासदार सस्मित पात्रा यांच्या उपस्थितीत बीजेडीमध्ये प्रवेश केला.

 

Related Articles