पूर्व दिल्ली आणि महिला उमेदवाराचे सख्य नाहीच!   

शीला दीक्षित आणि आतिशी यांचाही झाला पराभव

पूर्व दिल्ली लोकसभा

नवी दिल्ली : महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. घर, कंपनी सांभाळण्यापासून राजकारणापर्यंत ती चांगली कामगिरी करत आहे. पण भूतकाळात डोकावल्यास पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी एकाही महिला उमेदवाराला खासदार म्हणून निवडून दिले नाही.

हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत एकूण १४ निवडणुका झाल्या आहेत. यापैकी नऊ निवडणुकांमध्ये महिला उमेदवारांनी नशीब आजमावले, मात्र त्यांना यश मिळाले नाही. काँग्रेसच्या दिग्गज नेत्या शीला दीक्षित आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी सिंह यांनाही येथे निवडणुकीच्या मैदानात पराभवाला सामोरे जावे लागले.

१९८४ मध्ये पहिल्यांदा दोन महिलांनी लढवली निवडणूक या लोकसभा मतदारसंघात १९६७ मध्ये पहिली निवडणूक झाली होती, ज्यामध्ये तीन पुरुष उमेदवार रिंगणात होते. १९७१, १९७७ आणि १९८० या वर्षातही निवडणुकीच्या रणधुमाळीत नशीब आजमावायला एकही महिला पुढे आली नाही.

१९८४ मध्ये पहिल्यांदाच दोन महिलांनी या जागेवर निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये क्रांती तिवारी आणि हेमा भंडारी यांचा समावेश होता. लोकसभा निवडणुकीत क्रांतीला ९१६ तर हेमा यांना ५०६ मते मिळाली होती. यानंतर १९९९ च्या निवडणुका वगळता सर्व निवडणुकांमध्ये महिलांनीच निवडणूक लढवली.

शीला दीक्षित यांना मिळाली होती सर्वाधिक मते

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात सर्वाधिक मते मिळविणार्‍या महिलांमध्ये शीला दीक्षित या पहिल्या क्रमांकावर आहेत. १९९८ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर येथून निवडणूक लढवली होती. त्यांना पाच लाख १७ हजार ७२१ मते मिळाली होती. त्याच वर्षी भाजपचे लालबिहारी तिवारी खासदार म्हणून निवडून आले.

वर्ष महिला उमेदवार निवडून आलेले खासदार  पक्ष
१९६७ शून्य हरदयाल देवगण  भारतीय जनसंघ
१९७१ शून्य एचकेएल भगत  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७७ शून्य किशोर लाल जनता पक्ष
१९८० शून्य एच.के.एल भगत काँग्रेस
१९८४ दोन एच.के.एल भगत काँग्रेस
१९८९ एक एच.के.एल भगत काँग्रेस
१९९१ दोन बी.एल. शर्मा भाजप
१९९६ पाच बी.एल. शर्मा भाजप
१९९८ एक लाल बिहारी तिवारी भाजप
१९९९ शून्य लाल बिहारी तिवारी भाजप
२००४ एक संदीप दीक्षित काँग्रेस
२००९ दोन संदीप दीक्षित काँग्रेस
२०१४ एक महेश गिरी भाजप
२०१९ चार गौतम गंभीर भाजप 

Related Articles