काँग्रेस रोजगार क्रांती आणणार : खर्गे   

नवी दिल्ली : रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी, उद्योजकता सक्षम करण्यासाठी आणि तरुणांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काँग्रेस ’रोजगार क्रांती’ आणेल, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.समाजमाध्यमावर खर्गे यांनी पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सत्तेत आल्यास युवा न्याय हमीद्वारे आम्ही देशात ’रोजगार क्रांती’ आणू.  रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी, उद्योजकता सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू.  ज्यामुळे तरुणांचे भवितव्य उज्ज्वल होईल. ’भारती भरोसा’ हमी अंतर्गत काँग्रेस रोजगार दिनदर्शिकेनुसार ३० लाख नवीन नोकर्‍या देईल. सर्व शिक्षित तरुणांना प्रतिवर्ष १ लाख रुपये दराने एक वर्षाची प्रशिक्षणार्थी नोकरी देईल.

’पेपर फुटीपासून स्वातंत्र्य’ या हमी अंतर्गत पेपरफुटीची प्रकरणे टाळण्यासाठी   कायदा आणला जाईल. तात्पुरते कर्मचारी किंवा करारावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना सामाजिक सुरक्षा आणि तरुणांसाठी ५ हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी देण्यात येईल, असेही खर्गे यांनी म्हटले आहे.

Related Articles