पंतप्रधान मोदींची आज मेरठमध्ये सभा   

लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवारी) उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका सभेला संबोधित करून राज्यातील निवडणूक प्रचाराची सुरुवात करणार आहेत.  मेरठमधील भाजपचे नेते अंकित चौधरी म्हणाले, या लोकसभा निवडणुकीतील  पहिली प्रचार फेरी आज होणार आहे. या फेरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या निवडणूक फेरीची सुरुवात क्रांतीधारा मेरठ येथून होईल. मेरठ व्यतिरिक्त बागपत, बिजनौर, मुझफ्फरनगर आणि कैराना लोकसभा मतदारसंघातील लोक  पंतप्रधानांच्या फेरीत सहभागी होतील. प्रदेश सरचिटणीस अनुप गुप्ता यांच्याकडे भाजप मुख्यालयातून पंतप्रधानांच्या फेरीची जबाबदारी देण्यात आली आहे. या फेरीनंतर मोदींची सभा होणार आहे.दरम्यान, मेरठमध्ये भाजपने ’रामायण’ मालिकेतील रामाची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल यांना उमेदवारी दिली आहे.

Related Articles