सातार्‍यात रंगपंचमीला बरसल्या पावसाच्या सरी   

सातारा, (प्रतिनिधी) : तपमानाचा पारा ४० अंशांकडे जात असताना सातारा शहर परिसरात गाड्यात प्रचंड वाढ होत आहे, त्यातच भर दुपारी साडेतीनच्या सुमारास शनिवारी अचानक आलेल्या पावसाचे  टपोर्‍या थेंबांनी नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला, मात्र हा बरसणारा पाऊस फक्त पंधरा मिनिटे केवळ रस्ता ओला होण्यापुरताच पडल्याने पुन्हा उकाड्यांमध्ये प्रचंड वाढ होऊन सातारकरांना या उन्हाच्या काहीलीने आणि घामामुळे अक्षरशः वैतागाला  सामोरे जावे लागले.पडणार्‍या भरपावसात बालचमूंनी मात्र एकमेकाला रंग लावत रंगपंचमीचा आनंद  द्विगुणित केला. मागील दोन दिवसांपूर्वीही असाच हलका पाऊस सातारा शहर परिसरात झाला. मात्र त्यानंतर प्रचंड उकाड्यात वाढ होऊन सातारा शहरातील नागरिकांना नकोसे केले होते, आजही पडलेली आहे.

 

Related Articles