गीतरामायणाचे सत्तरीत पदार्पण   

‘गीतरामायण’ या अद्भुत निर्मितीस १ एप्रिल रोजी ६९ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून रिडिफाईन प्रॅाडक्शन्स पुण्यात आपल्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या निमित्ताने एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यावेळी सुधीर फडके आणि ग. दि. माडगुळकरांची पुढची पिढी, आकाशवाणी पुणे केंद्राच्या काही सन्माननीय व्यक्ती आणि ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचे निर्माते सौरभ गाडगीळ, लेखक-दिग्दर्शक, निर्माते योगेश देशपांडे, कलाकार सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे यांच्यासोबत गप्पांची मैफल रंगणार आहे.

१ एप्रिल १९५५ रोजी सुरू झालेल्या ‘गीतरामायण’ या शृंखलेचे ७० व्या वर्षांत पदार्पण होत असताना, या अजरामर कलाकृतीचा भावपूर्ण, गंधयुक्त आणि सुमधुर आठवणींचा खजिना, ‘गीतरामायण’चा रंजक प्रवास उलगडला जाणार आहे. हा कार्यक्रम उद्या दिनांक १ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता पंडित फार्म, डी. पी. रोड, कोथरूड, पुणे होणार आहे.

Related Articles