डिकॉकचे झंझावाती अर्धशतक   

लखनऊ : इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेतील ११ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स संघात लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊच्या डीकॉक याने ५४ धावा करत झंझावाती अर्धशतक केले. त्यामुळे लखनऊ संघाला १९९ धावांची मजल मारता आली. तर पुरन याने चांगली साथ देत ४२ धावा केल्या. पुरन याला रबाडाने त्रिफळाचित केले. त्यानंतर कृणाल पांड्या याने ४३ धावा केल्या. त्यामुळे लखनऊ संघाने २००  धावांचे आव्हान दिले.
 
दरम्यान, हा सामना पंजाबचा यंदाच्या हंगामातील तिसरा सामना आहे, तर लखनऊचा  दुसरा सामना होता. दरम्यान, लखनऊ यंदा पहिल्यांदाच घरच्या मैदानावर खेळला. त्यामुळे ते घरच्या मैदानात पहिला विजय मिळवण्यासाठी उत्सुक असतील. दरम्यान, या सामन्यात लखनऊचा संघ पंजाब किंग्सविरुद्ध का वरचढ ठरू शकतो, याचा आढावा घेऊ.
 
लखनऊचे मैदान हे गोलंदाजांना साथ देणारे आहे. पण असे असले, तरी जर खेळपट्टीवर टिकून राहून धावा केल्या, तर धावफलकावर चांगल्या धावा लागू शकतात. फलंदाजी फळीचा विचार करायला झाल्यास लखनऊची फलंदाजी पंजाबपेक्षा अनुभवी आणि तगडी आहे.त्यातही केएल राहुल आणि क्विंटन डीकॉक हे धीम्या गतीच्या या खेळपट्टीवर लखनऊची ताकद ठरू शकतात. पहिल्या सामन्यातही राहुलने अर्धशतक केले होते. त्यामुळे त्याच्याकडून या सामन्यातही अशीच अपेक्षा असेल. जर केएल राहुल आणि डी कॉक चांगली सुरुवात देऊ शकले, तर लखनऊसाठी ही मोठी जमेची बाजू ठरेल. लखनऊच्या मधल्या फळीत आयुष बडोनी, निकोलस पूरन, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस आणि कृणाल पंड्या असे फलंदाज फलंदाजी करू शकतात. हे सर्वच खेळाडू आक्रमक खेळासाठी ओळखले जातात. त्यामुळे ही लखनऊची सर्वात मोठी ताकद आहे.
 
पूरन चांगल्या फॉर्ममध्येही आहे. जर केएल राहुल आणि डीकॉक यांच्याकडून चांगली सुरुवात मिळाली, हे मधली फळी संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाऊ शकते किंवा लक्ष्याचा पाठलागही सहज करू शकते.
 
याशिवाय फलंदाजांमधील स्टॉयनिस, पंड्या, हुडा हे गोलंदाजीतही योगदान देऊ शकतात. पण हुडा या सामन्यात केवळ फलंदाज म्हणून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. त्याच्याऐवजी एक प्रमुख गोलंदाज इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवला जाऊ शकतो. या तुलनेत पंजाबच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाल्यास त्यांच्याकडे शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग, सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांचे पर्याय आहेत.
 

Related Articles