व्हॉट्सऍप कट्टा   

आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भिती नसते, मुळात संकटे आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात, या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो
जीवनात यशस्वी होतोच.
--
कंठ दिला कोकिळेला, पण रूप काढून घेतले.
रूप दिले मोराला, पण इच्छा काढून घेतली.
इच्छा दिली मानवाला, पण संतोष काढून घेतला.
संतोष दिला संतांना, पण संसार काढून घेतला.
संसार दिला चालवायला देवी-देवतांना, पण मोक्ष काढून घेतला.
हे मानवा, स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस.
देवाने तुझ्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं
--
कधी-कधी ज्वारीतील वेङ्या पाखरांना बघताना आयुष्याचा भास होतो...
बहुतांशी पाखरे अपयशाच्या बुजगावण्यांना घाबरून संधीच्या क्षेत्रात उतरतच नाहीत...
आणि, वावरातील बुजगावणी खोटी आहेत हे कळेपर्यत संधीचा हुरङा संपून पिकांची मळणी झालेली असते...!
पंखात धग अन् चोचीत रग असेपर्यत बुजगावण्यांना घाबरायचे काम नाही... अन् हे दोन्ही संपल्यावर जगण्यात पण काही राम नाही.
--
गुरुजी : मुलांनो, पाण्याचा अपमान कसा कराल ?
बंड्या : पाणी गरम करायचं आणि अंघोळच नाही करायची...
 

Related Articles