दक्षिण मुंबई २० मिनिटे अंधारात   

मुंबई : दक्षिण मुंबईतील काही भागात गुरूवारी रात्री वीज पुरवठा खंडित झाला होता. सुमारे २० मिनिटे अंधाराचे साम्राज्य पसरले होते.महापालिका मार्ग, जीटी रुग्णालय, क्रॉफर्ट मार्केट आणि मरीन लेन परिसरात रात्री साडेदहा वाजता अचानक वीजपुरवठा खंडित झाला. ९ वाजून ५ मिनिटांनी वीज आल्याने गाहकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 
 
डिस्कॉम बृहन मुंबई इलक्ट्रिक सप्लाय आणि बेस्ट यांच्यातर्फे या भागात वीजपुरवठा केला जातो. तांत्रिक बिघाडामुळे वीज गेली होती. टाटा पॉवर क्रँक बंडर फॅसेलिटीच्या ३३ किलोवॉट फीडरकडून जी. टी. रुग्णालय स्टेशनला वीजपुरवठा केला जातो. त्यात बिघाड झाल्याने सुमारे २० मिनिटे परिसरात अंधार होता. मात्र, तातडीने वीजपुरवठा पूर्ववत केला आहे, अशी माहिती प्रवक्त्याने दिली. टाटा पॉवर कंपनीने बेस्टच्या ३३ किलोवॉट तारेमध्ये बिघाड झाल्याचे रात्री सांगितले. पर्यायी यंत्रणेद्वारे तो पूर्ववत केल्याचे टाटा कंपनीने स्पष्ट केले. 

Related Articles