मोटार दरीत कोसळून दहा प्रवाशांचा मृत्यू   

जम्मू -काश्मीरमधील दुर्घटना

 
बनीहाल /जम्मू : जम्मू- काश्मीरमधील जम्मू श्रीनगर महामार्गावर मोटार दरीत कोसळून १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रामबन जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास दुर्घटना घडली.जम्मू- श्रीनगर असा प्रवास करणारी मोटार बॅटरी चष्मा परिसरात सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळली होती. चालकासह दहा प्रवाशांचे मृतदेह घटनास्थळी आढळले आहेत. चालक जम्मूचा असून एक प्रवासी बिहारचा रहिवासी आहे. शुक्रवारी सकाळी पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दलांनी  शोध आणि बचाव मोहीम राबविली. मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळे आले होते. दरम्यान, रामबनचे पोलिस उपायुक्त बसेर उल हक यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य राबविले होते. दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून पंतप्रधान कार्यालयातर्फे मृतांच्या नातेवाइकांना दोन लाखांची मदत जाहीर केली. राष्ट्रपती र्द्रौपदी मुर्मू, केंद्रीय मंत्री आणि उधमपूरचे खासदार जितेंद्र सिंग, नायब राज्यपाल मनोज सिन्हा, डेमोक्रॅटिक आझाद पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाींबद्दल दु:ख व्यक्त केले. 

 

Related Articles