शेअर बाजारात ६३९ अंकांची उसळी   

मुंबई : बँक आणि वित्तीय समभागांमधील खरेदीमुळे मुंबई शेअर बाजारात गुरूवारी ६३९ अंकांची वाढ झाली. तर एनएसई निफ्टीमध्ये २०३ अंकांची वाढ झाली. दिवसाच्या अखेरीस शेअर बाजार ७३ हजार ६५१ अंकांवर, तर निफ्टी २२ हजार ३२७ अंकांवर बंद झाला. बाजारातील तेजीमुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा शेवट गोड झाला.  गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.०६ लाख कोटींची वाढ झाली. तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली.

Related Articles