ग्यालसंग प्रकल्पासाठी भूतानला पाचशे कोटींचा दुसरा हप्ता जारी   

थिंफू : भारताने ग्यालसंग प्रकल्पाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भूतानला पाचशे कोटी रुपयांचा दुसरा हप्ता जारी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या दोन दिवसीय दौर्‍यात भूतानला विकास प्रकल्पांसाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते आणि हिमालयीन राष्ट्राला पुढील पाच वर्षांत दहा हजार कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. यानुसार ग्यालसंग प्रकल्पाशी संबंधित दुसरा हप्ता भूतानमधील भारताचे राजदूत सुधाकर दलाला यांनी भूतानचे परराष्ट्र व्यवहार आणि परराष्ट्र व्यापार मंत्री लियोनपो डी एन धुंग्येल यांना सुपूर्द केला. पाचशे कोटी रुपयांचा पहिला हप्ता यावर्षी २८ जानेवारी रोजी जारी करण्यात आला होता. 
 
भूतानच्या ऐतिहासिक उपक्रमात भारताला भूतानसोबत भागीदारी करण्याची संधी आहे आणि या भागीदारीचा भर युवा आणि कौशल्यांवर आहे. भारत सरकारने ग्यालसंग प्रकल्पासाठी सवलतीच्या वित्तपुरवठा व्यवस्थेवरील सामंजस्य करार अंतर्गत भूतान सरकारला एक हजार कोटी रुपये जारी केले आहेत. हा वित्तपुरवठा भूतान सरकारला भारत सरकारच्या नियोजित साहाय्याव्यतिरिक्त आहे, असे भारतीय दूतावासाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 

Related Articles