टोल वसुलीची नवी प्रणाली उपग्रह आधारित   

नवी दिल्ली : टोल नाक्यांवर टोल वसुलीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी सरकार टोल यंत्रणा रद्द करण्याचा विचार करत आहे. त्या जागी आता नवीन प्रणाली येणार आहे. ही प्रणाली उपग्रह आधारित असून, लवकरच ती सुरू केली जाईल, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 
 
गडकरी यांनी समाजमाध्यमावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मार्च २०२४ पर्यंत नवी प्रणाली लागू करण्यचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उद्दिष्ट होते. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे त्याला वेळ लागत आहे. लवकरच टोल नाके बंद करून उपग्रह आधारित यंत्रणेकडून टोल वसुली केली जाईल. या यत्रणेंतर्गत वापरकर्ते महामार्गावर जेवढे किलोमीटर अंतर पार करतील, त्यानुसार त्यांच्या बँक खात्यातून आपोआप पैसे कापले जातील. यामुळे त्यांना बचतीचीही संधी मिळेल. 

Related Articles