चीनने मालदीवला पाठवले १५०० टन पाणी   

माले : जलसंकटाचा सामना करणार्‍या मालदीवला चीनने तिबेटमधील हिमनद्यांमधून गोळा केलेले १५०० टन पिण्याचे पाणी पाठवले आहे. मालदीव सरकारने यासंदर्भात माहिती दिली आहे.चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाचे अध्यक्ष यान जिन्हाई यांच्या मालदीव भेटीदरम्यान मालदीवला पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तिबेटचा शिजांग स्वायत्त प्रदेश उच्च दर्जाच्या पाण्यासाठी ओळखला जातो. तेथील हिमनद्यांमधील पाणी स्वच्छ आणि खनिजांनी समृद्ध आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली होती. त्यादरम्यान मुइज्जू यांनी त्यांना देशात भीषण होत असलेल्या जलसंकटाची जाणीव करून दिली. त्यावेळी हिमनदी भागातून जमा झालेले पाणी त्यांना द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार चीनने मालदीवला पाणी पाठवले. 
 
दरम्यान, चीन मालदीवला वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे. यापूर्वी चीनने मालदीवला आधुनिक लष्करी उपकरणे आणि लष्करी साहित्याचा पुरवठा केला होता. वास्तविक, चीन आणि मालदीवमध्ये दोन लष्करी करार झाले होते. या करारांचे या देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा अंतिम अध्याय म्हणून वर्णन केले जात आहे.
 

भारतानेही केली होती मदत 

 
डिसेंबर २०१४ मध्ये जेव्हा मालदीवमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती, तेव्हा भारताने तात्काळ विमानाद्वारे मालदीवमध्ये पाणी पोहोचवले होते. यापूर्वीच्या मालदीव सरकारला भारताचा पाठिंबा होता. 

Related Articles